बाबासाहेब पुरंदरेंचं नाव घेत जितेंद्र अव्हाडांचा धक्कादायक दावा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बाबासाहेब पुरंदरेंनी (Babasaheb Purandre) मराठ्यांचा चुकीचा इतिहास लिहिला. त्यावेळी मी बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला. तेव्हा मला सुनिल तटकरे यांनी (Sunil Tatkare) बोलू नको असं सांगितलं. त्यांनी मला दम दिला, असा धक्कादायक दावा आमदार जितेंद्र अव्हाडांनी (Jitendra Awhad) केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठ्यांचा चुकीचा इतिहास लिहिला. मी त्यांना विरोध केला. त्यावेळी सुनिल तटकरे यांनी मला विरोध केला. त्यांनी मला बोलू नको असं सांगितलं. परंतू शरद पवारांनी (Sharad Pawar) मी तुझ्या पाठिशी आहे. तुला जे बोलायचं ते बोल, असं ठामपणे सांगितलं. मी बाबासाहेब पुरंदरेंच्या बाबतीत चुकीचं बोललो नाही. तुम्ही त्यांची बाजु घेतली होती,असा आरोप अव्हाडांनी केलाय.

मी शुद्र असल्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) माझ्यावर टिका करत असल्याचं ते म्हणाले. त्यांनी एकदा मागे बघितलं असतं तर त्यांना समजलं असतं. त्यांना मिळालेली पदे चांगल्या घराण्यांना देखील मिळाली नाहीत, अशी आठवण आव्हाडांनी तटकरेंना करून दिली.

साहेबांच्या शब्दामुळे शेकापने तुमच्या मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केलं. मला पालकमंत्री न बनवता, तुमच्या मुलीला पालकमंत्री केलं. तुमच्या मुलाला, मुलीला, पुतण्याला आणि भावाला आमदारकी दिली. तुम्हाला मंत्रीपद आणि खासदारकी दिली, असा टोला त्यांनी लगवला.

दरम्यान, त्यांनी यावेळी आरक्षणावरही भाष्य केलं. आरक्षणाची खरी गरज वंचित समुहाला आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की, आरक्षण हे आर्थिक उन्नतीतचं साधन नाही. गावाबाहेर राहणाऱ्या लोकांना बाबासाहेबांनी माणसात आणलं. त्यांना आरक्षण होतं. जगातील प्रत्येक देशात आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यामुळे जाती जातीमध्ये भांडण लावणं योग्य नाही, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स

शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का!