राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय!, धनगर समाजासाठी मोठी घोषणा

मुंबई | मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण पेटलेलं आहे. ओबीसींमध्ये समावेश करण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करण्यास मोठा विरोध होताना पहायला मिळतोय. राज्यात तणावाची परिस्थिती असताना सरकारनं धनगर समाजाला खूश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

धनगर समाजासाठी मोठी घोषणा होणार?

धनगर समाजाच्या विकासाठी राज्य सरकार बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) विकासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय होणार आहे. मराठा आरक्षणामुळे मराठा-ओबीसी आमने सामने आले असताना धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

नेमका काय मोठा निर्णय घेतला जाणार?

धनगर समाजाच्या विकासासाठी ‘शक्तिप्रदत्त समिती’ (Shaktipradatta Committee) तयार करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समितीचे अध्यक्ष असणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आणि इतर मंत्री असे एकूण 11 सदस्य या समितीमध्ये असणार आहेत. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती आहे.

धनगर समाजाला काय फायदा होणार?-

राज्यातील धनगर समाजाकडून गेल्या काही काळापासून विविध मागण्या होत आहेत, यामध्ये प्रामुख्याने धनगर समाजाला आदिवासींचा दर्जा देण्याची तसेच त्यांना एसटी प्रवर्गाचे सर्टिफिकेट देण्याची मागणी केली जात आहे. आपल्या या मागणीसाठी धनगर समाजाने अनेकदा आंदोलनही केलं आहे. आता याच प्रश्नावर राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात येत असून विविध राज्यांतील आरक्षणाचा अभ्यास करून समिती यासंदर्भात निर्णय घेणार आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला ओबीसींचं राजकीय आरक्षण आहे. मात्र, देशातील अनेक राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू आहे. धनगड आणि धनगर या शब्दांमुळे राज्यातील धनगर समाज एसटी आरक्षणापासून वंचित आहे. यावरील प्रकरण न्यायालयातही पोहचलं आहे. डिसेंबर महिन्यात यावर सुनावणी होणार असून अंतिम निकालही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडेही धनगर बांधवांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बाबासाहेब पुरंदरेंचं नाव घेत जितेंद्र अव्हाडांचा धक्कादायक दावा!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणावर बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य!

मोठी बातमी! ठाकरेंना धक्का; सगळ्यात जवळच्या नेत्याला ईडीचं समन्स