मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नाशिक | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. राज्य सरकारने (State Government) त्यासाठी न्या. सतिष शिंदे समितीवर (Satish Shinde Commission) जबाबदारी सोपवली आहे.अशातच नाशिक महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. कुणबी नोंदी शोधण्यासाठी नाशिक महापालिकाने ( Nashik Municipal Corporation) मोहीम हाती घेतली आहे.

नेमका काय निर्णय घेतला आहे?

नाशिक महापालिका शहरातील जुन्या कुणबी नोंदी शोधणार आहे. 1897 ते 1967 या दरम्यान असणाऱ्या कुणबी नोंदी शोधल्या जाणार आहेत. पुढील चार दिवसात या नोंदी शोधल्या जाणार आहेत. महापालिकेच्या शिक्षण आणि जन्म-मृत्यू नोंद विभागावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने या नोंदी शोधल्या जाणार आहेत.

पुढील चार दिवसात नाशिक शहरातील कुणबी नोंदी शोधायच्या आहेत. जोपर्यंत कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महापालिका शाळेच्या शिक्षकांना आणि जन्म-मृत्यू नोंद विभागातील कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार नाही, असा आदेशच महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी दिला आहे.

नाशिक शहरातील पूर्वीच्या बहुतांश नोंदी मोडी लिपीत आहेत. यासाठी पालिकेला जाणकार व्यक्तींची गरज भासणार आहे. त्यासाठी महापालिकेने शिक्षकांची मदत घेतली आहे. ही जबाबदारी मनपा शाळेच्या 836 शिक्षकांवर सोपवली आहे.

दरम्यान, न्या. सतिष शिंदे समितीने मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधल्या आहेत, हे काम मराठवाड्यात अजूनही सुरु आहे. महत्त्वाची बाब म्हणजे समितीला मराठवाड्यात आतापर्यंत तब्बल 11 हजारांहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी नोंदी असलेल्या वंशजांना राज्य सरकारकडून कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!