“त्या पेटलेल्या कार्यालयात…”, संदीप क्षीरसागर आणि रोहित पवारांचा मोठा निर्णय

बीड | मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी बीड जिल्ह्यात जाळपोळ करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला देखील आग लावण्यात आली होती. या पेटलेल्या कार्यालयाबाबत बीड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर ( (Sandip Kshirsagar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आलाय?

दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. यंदाची दिवाळी (Deepawali) रोहित पवार आणि संदिप क्षीरसागर कुटुंबियांसह राष्ट्रवादीच्या बीड जिल्हा कार्यालयात साजरी करणार आहेत. बीड हिंसाचाराच्या घटनेत संदिप क्षिरसागर यांचे घर आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आग लावली होती. त्यावेळी प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर दोन्ही आमदारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी एक फेसबुक पोस्ट करत हल्ल्याविषयी माहिती दिली होती. “ज्यावेळी घरावर हल्ला झाला, त्यावेळी मी कुटुंबियांसह घरातच होतो. हा हल्ला मराठा आंदोलकांनी केला नाही,  स्थानिक लोकांनाही केला नाही. समाजकंटकांनी हा हल्ला घडवून आणला आहे. वेळ आल्यावर मी सर्व पुराव्यांनिशी यावर बोलेल”, असं त्यांनी म्हटलं होतं.

सरकारने तातडीनं योग्य निर्णय घ्यावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सुरवातीपासून मी या मागणीला पाठिंबा दिला आहे. यासाठी मी वारंवार सरकार दरबारी मागणी केली आहे. यापुढेही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितले होतं.

दरम्यान, रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील पेटवलेल्या कार्यालयात दिवाळी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे.  या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास द्विगुणीत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप