भाजपच्या बड्या मंत्र्याचा भयानक अपघात, प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

नवी दिल्ली | देशभरात वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय, त्यातच आता भाजपच्या नेत्यांच्या अपघाताच्या बातम्या येत आहेत. राज्यात भाजपचे नेते अशोक नेते यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका भाजपच्या बड्या नेत्याच्या गाडीला अपघात झाला आहे.

कुणाच्या गाडीला झाला अपघात?

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात सुदैवानं ते बचावले आहेत. मंत्री बचावले असले तरी एका दुचाकीस्वाराचा मात्र या अपघातात मृत्यू झाला आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे इतर तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत, तर प्रल्हाद सिंह पटेल हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून ते सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

कसा घडला अपघात? महत्त्वाची माहिती-

मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथे हा धक्कादायक अपघात घडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रल्हाद सिंह यांचा ताफा छिंदवाडा येथून नरसिंहपूरच्या दिशेला जात होता. यावेळी समोरुन अचानक एक दुचाकीस्वार आला. त्या दुचाकीस्वाकाला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रल्हाद सिंह पटेल यांची गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरली, मात्र तरी अपघात झाला. या अपघातात 35 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?
अपघात झाला त्याच नरसिंहपूरच्या मतदारसंघाचे प्रल्हाद सिंह हे भाजपचे उमेदवार देखील आहेत. पण त्यांच्यासोबत आज ही अनपेक्षित आणि दुर्देवी घटना घडली आहे. नुकसानग्रस्त झालेल्या फॉर्च्यूनर गाडीचा व्हिडीओ देखील समोर आलाय. या व्हिडीओत अपघात किती जबर होता हे स्पष्ट होतंय. गाडीला बसलेली धडक इतकी मोठी आहे की गाडीच्या पुढच्या भागाचं प्रचंड नुकसान झालंय.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!

बांदेकरांना पुन्हा संधी नाही; सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद ‘या’ नेत्याकडे

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप