मोहम्मद शमीच्या कामगिरीमुळे हसीन जहाँ खूश; म्हणाली, त्याची कमाई…

मुंबई | भारतीय क्रिकेटपटु मोहम्मद शमी यंदाच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून शमीने गेल्या 3 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान या आधी शमी त्याच्या घरगुती वादामुळे चर्चेत आला होता.

शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार प्रकरणी कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयाने शमीचा जामीन मंजूर केला आहे. सध्या शमी वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे खेळत आहे त्यावरुन शमीच्या पत्नीला त्याच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिने दिलेल्या उत्तरांनी अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत.

काय म्हणाली हसीन जहाँ?

मी कधी क्रिकेट बघत नाही त्यामुळे तसेच मी क्रिकेटची फॅन नाही. मला क्रिकेट आवडत नाही. त्याने किती विकेट घेतल्या त्यातलं मला काही कळत नाही. तो चांगलं खेळतोय, त्यामुळे तो संघात टिकून राहिल. त्यामुळे त्याची कमाई देखील चांगली राहिल, त्यामुळे आमचं भविष्य सुरक्षित असेल, असं ती म्हणाली.

मी टीम इंडियाला शुभेच्छा देईल, पण मी त्याला शुभेच्छा देणार नाही, शमी कसा खेळतो, तो फायनलमध्ये कसा खेळतो? मला त्याने फरक पडत नाही. लोक त्याला कसा समजतात, याने देखील मला फरक पडत नाही, असंही हसीन जहाँ म्हणाली आहे.

मला ऐवढंच माहितीये की, तो माझा पती आहे आणि त्याने आम्हाला सांभाळायचं आहे, बाकी शमी मला कधी कोणत्याही टूरला घेऊन जात नव्हता. मला नेहमी दबावात ठेवायचं काम तो करायचा. मी त्याच्याशी भांडून 3 किंवा 4 टूरला त्याच्यासोबत गेले. मात्र, तिथंही त्याने मला नीट वागवलं नाही, असा आरोपही तीनं केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

भुजबळांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा मराठा आरक्षणाला विरोध!