मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा!

मुंबई | राज्यात गेले काही दिवस मराठा आरक्षणावरुन वाद विवाद होत आहेत. दरम्यान राज्यात आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टात ओबीसींना आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा, अशी मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

याचिकाकर्त्यांनी आजच या संदर्भातल्या प्रलंबित याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती केली, मात्र मुख्य न्यायमूर्तींनी आज सुनावणी घेण्यास नकार दिला. या याचिकेसह इतर याचिकांना क्लब करुन उद्या सुनावणी घेणार असल्याचं न्यायमू्र्तींनी स्पष्ट सांगितलं आहे.

दरम्यान, उद्या मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. माध्यमांच्या माहितीनूसार मराठा समाजाच्या वकिलांनी ओबीसी आरक्षणाच्या 23 मार्च 1994 च्या अध्यादेशाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द करा. ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करा. तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती द्या, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

बाळासाहेब सराटे, प्रशांत भोसले आणि शिवाजी कवठेकर अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश! 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार

अजित पवार यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर! 

‘कोणाला डेंग्यूच काय होतो….’; काँग्रेसचा बडा नेता संतापला

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!