बिहार | बिहारमध्ये जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर करण्यात आली. यावर विधानसभेत चर्चा सुरु झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी असं धक्कादायक वक्तव्य केलं. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला.
आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. या अधिवेशनातच बदल अंमलात आणायचे आहेत. बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित राहिल्या तर लोकसंख्या नियंत्रणात येईल, असं नितीश कुमार म्हणालेत.
लग्न झालं तरच मुलगी शिकेल. मग तो माणूस रोज रात्री करतो. त्यातच आणखी एक जन्म होतो. मुलगी शिकत असेल तर तिला ठेवू नका, तिला बनवा, म्हणूनच संख्या कमी होत आहे, असं नितीश कुमार म्हणालेत.
साक्षरतेत बरीच सुधारणा झाली आहे. 51 टक्क्यांवरून 73 टक्क्यांच्या वर गेला आहे. स्त्री शिक्षणाची स्थिती बरीच सुधारली आहे, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.
बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती कशी वाढवली जाईल याची रूपरेषाही तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50 वरून 65 करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. EWS च्या 10 टक्के समावेश करून आरक्षण 75 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार अनुसूचित जातींसाठी सध्या उपलब्ध असलेले 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के करण्यात येणार आहे. तर, एसटी 1 टक्क्यांवरून 2 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तर ईबीसी (अत्यंत मागास) आणि ओबीसी यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा!
मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश!
Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार