भाषणानंतर मोदींकडून एकनाथ शिंदेंना शाब्बासकी!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात (PM Modi In Mumbai) मेट्रो तसंच वेगवेगळ्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. या लोकार्पणाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण केलं.

शिंदेंचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंना शाब्बासकी दिल्याचं पाहायला मिळालं. शिदेंनी भाषणात मागील माहाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेेच मागच्या अडीच वर्षात काहीच विकास झाला नसल्याचं सांगत ठाकरेंवर टीका केली.

महाविकासआघाडी सरकार असताना किती विकास झाला हे तुम्हाला माहिती आहे. लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, यातून मुंबईकरांची आणि राज्याची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली, ती मोदींमुळे मिळाली आहे, असं शिंदे यावेळी म्हणालेत.

येत्या दोन-अडीच वर्षात मुंबईचा कायापालट होईल. ऑक्टोबर 2015 साली पंतप्रधानांनी याच मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं, आज त्यांच्याच हस्ते या सेवेचं लोकार्पण होणार आहे, हा दैवी योग असल्याचंही शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-