‘मुंबईतील माझ्या सर्व’, मोदींची भाषणाला मराठीतून सुरूवात

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबईत (Mumbai) आज तब्बल 38 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन होतंय. यावेळी बोलताना मोदींनी भाषणाला मराठीतून सुरूवात केल्याचं पाहायला मिळालं.

नरेंद्र मोदींच्या आधी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं, या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाळ्या वाजवल्या.

मोदीजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात डबल इंजिन सरकार आलं. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेनं डबल इंजिन सरकार दिलं होतं, पण काहींनी बेईमानी केली, त्यामुळे जनतेच्या मनातलं सरकार बनलं नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार बनलं, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देखील यावेळी बोलताना नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच महाविकास आघाडीसरकावर सडकून टीकाही केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-