Gautami patil | मराठा समाजाला आरक्षण हवं की नको?, गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautami patil | मराठा आरक्षणावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आता या मुद्द्यावर नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami patil) भाष्य केलं आहे. गौतमीची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना गौतमी पाटीलने मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Gautami patil चं मोठं वक्तव्य

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं म्हणत गौतमी पाटीलने जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालंच पाहिजे, असं गौतमी पाटील (Gautami patil) म्हणालीये.

मला देखील आरक्षण पाहिजे. मला देखील कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असं गौतमी म्हणाली. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती, असं देखील गौतमी म्हणाली.

Gautami patil राजकारणात येणार?

गौतमी पाटील राजकारण एन्ट्री करणार का? असा प्रश्न जेव्हा गौतमीला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, “मी अजिबात राजकारणात जाणार नाही.”

गौतमी पाटीलचा घुंगरु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता चित्रपटांमध्ये काम करताना गौतमी नृत्यक्षेत्र सोडणार का? असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता. याबद्दल गौतमी म्हणाली, ‘नवा चित्रपट मिळाला तर करेन पण मी चित्रपट मिळाला तरी डान्स करणं सोडणार नाही’.

दरम्यान,मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं देखील चांगलं होवो.आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचं चांगलं होऊ दे, असं आम्ही म्हणतो

महत्त्वाच्या बातम्या-

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार… हवामान खात्याचा मोठा अलर्ट

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!

देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पत्ता कट?, राज्यात भाजपचं सरकार आलं तर ‘हे’ नेते होऊ शकतात मुख्यमंत्री

Bollywood News | ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

Parliament | आताची सर्वात मोठी बातमी! लोकसभेत घडला धक्कादायक प्रकार