Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण ही भारताच्या सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या रांगेतही दीपिकाचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. आपल्या कारकिर्दीत दीपिकाच्या बहुतांश चित्रपटांची चर्चा झाली, तेवढीच तिच्या खासगी आयुष्याची देखील चर्चा झाली. आता एक नवीनच चर्चा सुरु झाली आहे.
दीपिका पादुकोण झाली होती ट्रोल-
दीपिका (Deepika Padukone) आणि तिचा पती रणवीर सिंग नुकतेच कॉफी विथ करण या कार्यक्रमात दिसले होते. या कार्यक्रमात बोलताना दोघांनी अनेक गौप्यस्फोट केले. दोघांच्या नात्याबद्दल या आधी कुणालाही नसेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. रणवीर सिंगसोबत तिचं कसं जुळलं आणि पुढे काय काय घडलं याचा सारा वृत्तांतच दीपिकाने या मुलाखतीत सांगितला.
दीपिकाने सांगितलेल्या काही गोष्टी खटकल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंलं पहायला मिळालं. या मुलाखतीत बोलताना दीपिकाने एक मोठा खुलासा केला. यानूसार तीने आणि रणवीरने 2015 सालीच एंगेजमेंट केल्याची माहिती तिने दिली. तिच्या याच वक्तव्यावरुन तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
दीपिकाला कुणासोबत करायचं होतं लग्न?-
दीपिकाचं अभिनेता रणबीर कपूरसोबत असलेलं प्रेमप्रकरण साऱ्या देशात चर्चेचा विषय ठरलं आहे. दोघांचं ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या (Deepika Padukone) आयुष्यात रणवीर सिंगची एन्ट्री झाली. त्यानं तिला इम्प्रेस केलं आणि अखेर तिच्यासोबत लग्न सुद्धा केलं, मात्र या दोघांशिवाय दीपिकाला तिसऱ्याच अभिनेत्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती.
दीपिकाने 2017 साली हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेता Vin Diesel सोबत तिचा ट्रीपल एक्स नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमाच्या निमित्ताने तीने दिलेल्या एका मुलाखतीत Vin Diesel संसार बसवण्याची इच्छा होती असं सांगितलं होतं. इंटरव्ह्यू कर्त्यांनी तिला दोघांचा एक फोटो दाखवून दोघांमध्ये काय चाललं होतं असा सवाल केला होता.
प्रश्नाचं उत्तर देताना दीपिका नेमकं काय म्हणाली होती?
दीपिका म्हणाली होती, “आग लागल्याशिवाय धूर निघत नाही… मी त्यावेळी विचार करत होते की विन आणि मी सोबत आहोत, आमची केमिस्ट्री फार छान आहे.. आम्ही सोबत राहतोय आणि आमची छान छान मुलं देखील आहेत, मात्र हे सगळं माझ्या मनात चाललं होतं.” 2015 साली रणवीरसोबत साखरपुडा केल्यानंतरही दीपिका विनचा विचार करत होती यावरुन दीपिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
News Title: deepika padukone wanted to marry with vin diesel
महत्त्वाच्या बातम्या-
Gautami patil | मराठा समाजाला आरक्षण हवं की नको?, गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य
Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार… हवामान खात्याचा मोठा अलर्ट
Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!
Bollywood News | ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट