Viral Video | बीड येथील शिक्षकांचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सगळीकडे एकच खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Viral Video | सध्या सोशल मीडियाचा अतिप्रमाणात वापर होत असताना दिसत आहे. त्यात जर एखादा व्हिडीओ व्हायरल झालाच तर मात्र तो बाकी चार लोकांना सुद्धा शेअर केला जातोच. असाच एका धक्कादायक व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बीडमधील या व्हिडीओमुळे साऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडीओची चर्चा-

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील शाळेतील तीन शिक्षकांचा व्हिडीओ व्हायरल (viral video) होत आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षक आणि महिला शिक्षक शाळेच्या परिसरात अश्लील वर्तणूक करताना दिसत आहेत.

काय आहे नेमका प्रकार?

बीडमधील नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील महिला सहशिक्षकेसोबत गैरवर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. त्यानंतर सर्व माहिती मिळाल्यानंतर संबधित शिक्षकाला नोव्हेंबरमध्ये निलंबित देखील करण्यात आलं होते.

मात्र, या नामांकित शाळेतील व्हिडिओ प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि महिला यांनी परीक्षा विभाग आणि कॅम्पसमधील इतर आवारात अश्लील कृत्य केलं. तसेच, या कृत्याचा व्हिडिओही शूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी या शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पालकांनी संताप व्यक्त केला-

घडलेल्या प्रकारावरुन शाळेच्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. तर शाळेतील विद्यार्थांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा म्हणजे पवित्र स्थान म्हणून मानलं जातं, शिवाय आयुष्याची जडणघडण येथेच होते. जर या शाळेच्या शिक्षकांनीच असे कृत्य केले तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल असा प्रश्न निर्माण होत आहे.

News Title : viral video beed school teachers

थोडक्यात बातम्या –

Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार… हवामान खात्याचा मोठा अलर्ट

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!

देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पत्ता कट?, राज्यात भाजपचं सरकार आलं तर ‘हे’ नेते होऊ शकतात मुख्यमंत्री

Bollywood News | ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट

Parliament | आताची सर्वात मोठी बातमी! लोकसभेत घडला धक्कादायक प्रकार