देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) पत्ता कट?, राज्यात भाजपचं सरकार आलं तर ‘हे’ नेते होऊ शकतात मुख्यमंत्री

Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी धोक्याची घंटा वाजताना दिसत आहे. भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चांगल्या नसल्याचं मानलं जात आहे, त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी बसण्याची संधी मिळणार की नाही यावर शंका निर्माण झाली आहे.

भाजपमध्ये सुरु झालाय नवा पॅटर्न-

नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. या राज्यांच्या निकालात भाजपने बाजी मारल्याचं पहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा अद्याप कायम असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. त्याचाच परिणाम भाजपचं सरकार आलेल्या राज्यांमध्ये पहायला मिळत आहे.

Vishu Mohan Bhajan jpg

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं राज्यातील प्रस्थापित नेतृत्त्वाला डावलल्याचं चित्र भाजपची सत्ता आलेल्या तिन्ही राज्यांमध्ये पहायला मिळालं आहे. छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांना डावलत विष्णुदेव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली. मध्य प्रदेशमध्ये बलाढ्य शिवराज सिंह यांच्या जागी मोहन यादव यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली तर तिकडे वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वाला नकार देत पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केलं आहे.

तिन्ही राज्यांमध्ये भाजपनं केलेले उलटफेर चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने यातून राज्यांमध्ये शक्तिशाली बनू पाहणाऱ्या नेत्यांचे पंख छाटल्याची चर्चा आहे. मोदी-शहा यांच्या केंद्रातील सत्तास्थानाला धक्का पोहोचू नये म्हणून अशा प्रकारचे निर्णय घेतले गेल्याचीही जोरदार चर्चा आहे. यातून भाजपमधील इतर शक्तिशाली नेत्यांना संदेश देण्याचा मानस असल्याचं मानलं जात आहे.

आता महाराष्ट्रात काय होणार?

भाजपने तिन्ही राज्यातील पक्षाच्या बलाढ्य नेत्याला साईडला केलं आहे. महाराष्ट्रात सध्या बलाढ्य असलेल्या सर्वच नेत्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये सध्या चलती फक्त एकाच माणसाची आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस…(devendra fadnavis) मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे सरकार बनलं त्यात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनायला सांगून भाजपने आधीच देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापल्याची चर्चा आहे, त्यात पुन्हा महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

devendra fadnavis 1

तिन्ही राज्यांमधील भाजपचा निर्णय पाहता राज्यातील प्रस्थापित बलाढ्य नेत्यांना साईडला केलं जात आहे, या न्यायाने देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडावा लागू शकतो. त्यामुळे त्यांच्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बनण्यासाठी सक्षम आणि भाजप नेतृत्वाला पसंत पडेल असा चेहरा कोण?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस नाही तर मग कोण?

1. चंद्रकात पाटील- चंद्रकांत पाटील मधल्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी त्यांची एकच चर्चा होती. भाजपने त्यांना पुण्याच्या कोथरुड या सुरक्षित जागी तिकीट देऊन निवडून सुद्धा आणले होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटलांना थोडं साईडला केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना केंद्रीय नेतृत्वाकडून साईडला केलं गेलं तर चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पक्ष संघटना, RSS तसेच केंद्रीय नेतृत्त्वासोबतचा त्यांचे संबंध यावर ही गोष्ट अवलंबून आहे.

2. विनोद तावडे- विनोद तावडे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणापासून दूर आहेत. मुंबईतील भाजपचा मुख्य चेहरा असलेल्या तावडेंना 2019 साली चक्क विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं, त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत काम सुरु केलं. केंद्रीय नेतृत्त्वाकडे सध्या विनोद तावडे यांचं वजन चांगलंच वाढलेलं दिसत आहे. राजस्थानचा मुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग बघायला मिळाला, त्यामुळे राज्याच्या राजकारणात तावडे यांची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता आहे. पर्यायाने भाजपचं सरकार आलं तर तावडेंच्या गळ्यात सुद्धा मुख्यमंत्रिपदाची माळ पडू शकते.

Vikhe With Modi

3. राधाकृष्ण विखे-पाटील- सध्या राज्यात मराठा आंदोलनानं पेट घेतला आहे. मराठा समाजाला खूश करण्यासाठी मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्याकडे भाजपचा कल असू शकतो. याशिवाय भाजपमधील नेत्याला मुख्यमंत्री केलं तर पक्षांतर्गत विरोध सहन करावा लागू शकतो, त्यापेक्षा बाहेरुन आलेल्या आणि सध्या पक्षात चांगले रुळलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा देखील मुख्यमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये विखे पिता पुत्रांनी मोदी तसेच शहांसोबत चांगले संबंध वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसलं. यामध्ये त्यांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शिर्डीला आणणं असो तसेच या कार्यक्रमांना विक्रमी गर्दी गर्दी आणणं असो. विखे पिता पुत्रांनी या गोष्टी लिलया केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतून थेट विखेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सांगितलं गेलं तर नवल वाटणार नाही.

4. चंद्रशेखर बावनकुळे- बावनकुळे यांच्या गळ्यात नुकतीच प्रदेशाध्यपदाची माळ पडली आहे. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष एका प्रकारे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानला जातो. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रुपाने दिल्लीश्वरांना एक नवा पर्याय असू शकतो. त्यामुळे बावनकुळे यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.

5. अत्यंत नवखी नावं- भाजपची धक्कातंत्र देण्याची पद्धत पाहता कुणाचं नाव ऐन क्षणी पुढं येईल सांगता येत नाही. राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या भजनलाल शर्मा यांना नंबर लागला. वसुधरा राजे यांना मुख्यमंत्री न करता त्यांनाच नाव सुचवण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे, उद्या तसंच झालं तर कदाचित देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच एखादं नवं नाव सुचवण्यास सांगितलं जाऊ शकतं. अशावेळी फडणवीस आपल्या मर्जीतील नेत्यांची नावं सांगू शकतात. यामध्ये प्रवीण दरेकर, संजय कुटे, राहुल नार्वेकर, अभिमन्यू पवार, नितेश राणे, राम सातपुते या नावांचा सट्टा निघाला तर आश्चर्य वाटणार नाही.

News Title: Devendra Fadnavis is in trouble in bjp

महत्त्वाच्या बातम्या-

कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन