Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rinku Singh | भारतीय संघाचा सध्याचा सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने सातत्याने केलेली चांगली कामगिरी त्याच्या चर्चेचा विषय ठरत असते. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (INDvSA) दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघातील रिंकू सिंगची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे, त्याला कारणही तसंच आहे.

सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. दुसऱ्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला, मात्र डकवर्थ लुईस नियमानूसार दक्षिण आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आलं. या सामन्यातील रिंकूच्या एका कारनाम्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय केलं रिंकू सिंगनं?

रिंकू (Rinku Singh) नेहमी आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. दुसऱ्या T-20 सामन्यात जेव्हा भारताला गरज होती तेव्हा तो धावून आलेला पहायला मिळालं. पहिल्यांदा फलंदाजी करताना एकवेळ भारताची अवस्था 6 धावांवर 2 बाद अशी होती. भारताच्या दोन्ही सलामीवीरांना साधं खातं सुद्धा उघता आलेलं नव्हतं. अशा काळात तिलक वर्मानं कर्णधार सूर्यकुमार यादवच्या मदतीने भारताचा डाव सावरला.

तिलक वर्मा बाद झाल्यानंतर रिंकू फलंदाजीला आला. रिंकूने आल्या आल्या चौकार मारुन आपल्या खेळीला सुरुवात केली. सूर्यकुमारच्या मदतीने त्याने भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली. 19 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मारक्रमला दोन खणखणीत षटकार ठोकले.

रिंकू सिंगने मारलेले षटकार जबरदस्तच होते, मात्र त्यातील एक षटकार चांगलाच उत्तुंग होता. या षटकाराने थेट मीडिया बॉक्समधील काचच फोडली. रिंकू सिंगच्या (Rinku Singh) या षटकाराची आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना पहायला मिळत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 19.3 षटकांवर भारताचा डाव थांबवावा लागला, तेव्हा धावफलकावर भारताच्या 180 धावा होत्या तर रिंकू सिंगने 39 चेंडूत 68 धावा केलेल्या होत्या.

पाहा रिंकूचा तो षटकार-

 

रिंकूची मेहनत गेली वाया-

दरम्यान, भारतानं दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्या पार करणं दक्षिण आफ्रिकेला (INDvSA) भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी केल्यानं सोपं गेलं, त्यात पावसाच्या व्यत्ययामुळे 13.5 षटकात 154 धावा केलेल्या दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमानूसार विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे या T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली आहे.

News Title: Rinku Singh brakes media box glass INDvSA

महत्त्वाच्या बातम्या-

Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन

Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती

IPL 2024 Auction | “किती पण ओता पैसा… पण हा 17 वर्षाचा खेळाडू आपल्याच संघात हवा”

Team Indiaच्या गोलंदाजानं उडवला हाहाकार!, 11 धावांच्या आत घेतल्या 7 विकेट

Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर