CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | 2023 संपणार आहे, त्यामुळे अनेक कार (CAR) निर्माते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंट ऑफर घेऊन येत आहेत. टाटा मोटर्सपासून ते मारुती आणि इतर अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर सूट देण्यात येत आहे. या ऑफरचा लाभ डिसेंबर 2023 अखेरपर्यंत घेता येईल.

‘या’ CAR वर मिळतोय डिस्काऊंट

Tata Harrier- टाटा हॅरियरची अपडेटेड व्हर्जन नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे अनेक डीलरशिपवर जुने मॉडेल पडून आहेत, ज्यावर दीड लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.

Tata Harrier ही एक SUV आहे, ज्यामध्ये 2.0 लीटर डिझेल इंजिन आहे, जे 168bhp पॉवर जनरेट करते. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये येते.

MG Hector- एमजी मोटर्सच्या एमजी हेक्टर कारवर (CAR) 5,000 रुपयांपर्यंतची सूट देखील उपलब्ध आहे. एमजी हेक्टर 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.0 लिटर डिझेल इंजिनसह येते. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Jimny- मारुती जिमनीवर 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही देखील एक एसयूव्ही आहे जी महिंद्राच्या थारला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आली आहे. अलीकडेच मारुतीने जिमनी, थंडर एडिशनची स्वस्त आवृत्ती लाँच केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 10.74 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

CAR घेणार असाल तर ‘ही’ काळजी घ्या  

दरम्यान, जेव्हा तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तेव्हा बजेट, मॉडेल आणि भविष्यातील खर्चाचा विचार करूनच कार घेण्याचा विचार करा. जर तुम्ही कर्जावर कार खरेदी करत असाल तर व्याज आणि सर्व गोष्टींची माहिती नक्कीच मिळवा. बजेट, मॉडेल आणि भविष्यातील खर्चाचा विचार करूनच कार घेण्याचा विचार करा. जर तुम्ही कर्जावर कार खरेदी करत असाल तर व्याज आणि सर्व गोष्टींची माहिती नक्कीच मिळवा.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन

Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती

IPL 2024 Auction | “किती पण ओता पैसा… पण हा 17 वर्षाचा खेळाडू आपल्याच संघात हवा”