Ravindra Berde | मराठी सिनेसृष्टीला धक्का; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या सख्ख्या भावाचं निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डेंचं (Ravindra Berde) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Ravindra Berde यांचं निधन

रविंद्र बेर्डेंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा तारा आपण गमावला, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

रवींद्र बेर्डे यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांची अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी हिट ठरली होती.

Ravindra Berde हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ

रविंद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. लक्ष्मीकांत – रविंद्र या दोघांनीही एकत्र अनेक सिनेमांंमध्ये काम केलंय. पण या दोघांनी मराठी रंगभूमीही गाजवलीय.

रविंद्र बेर्डे – लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. धडाकेबाज, चंगू मंगू, माझा छकुला अशा अनेक सिनेमांमध्ये रविंद्र – लक्ष्मीकांत जोडीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली.

महत्त्वाच्या बातम्या- 

Weather Update | डिसेंबर महिन्यात थंडी काय म्हणणार?, महत्त्वाची माहिती

IPL 2024 Auction | “किती पण ओता पैसा… पण हा 17 वर्षाचा खेळाडू आपल्याच संघात हवा”

Team Indiaच्या गोलंदाजानं उडवला हाहाकार!, 11 धावांच्या आत घेतल्या 7 विकेट

Manoj Jarange | जरांगे पाटील यांना नेमकं झालं काय? मोठी माहिती समोर

RBI | तुम्ही कर्ज घेतलं असेल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!