राज ठाकरे धुमाकूळ घालणार? पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी

Graduate Election l लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता पदवीधर निवडणूक जाहीर झाली आहे. पदवीधर निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माणसेनेने उडी घेतली आहे. त्यामुळे आता पदवीधर निवडणूक चांगली धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवली आहे.

पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी :

पदवीधर निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण विभागातून एक दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे या पक्षाकडूनअभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत माहिती देण्यात आली आहे.

मनसेनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.” मनसेच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Graduate Election l अभिजीत पानसे हे कोण आहेत? :

कोकण विभागातून पदवीधर निवडणुकीसाठी मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, आता अभिजीत पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल राज्यातील जनतेकडून विचारण्यात येत आहे. सध्या कोकण विभागात पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत.

मात्र त्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. अशातच त्यांच्या या जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोकण निवडणुकीत पदवीधरसाठी येत्या 26 जूनला मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही 1 जुलैला होणार आहे. कोकण विभाग मनसे उमेदवार अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत.

News Title – Graduate Election Candidate Abhijeet Panse

महत्त्वाच्या बातम्या

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर

मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले