राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ; पाच जणांचा मृत्यू

Unseasonal Rain | राज्यात सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होताना दिसत आहे. राज्यातील काही जिल्ह्याला अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपलं असून लोकांची दाणादाण उडाली आहे. काहींच्या घरावरील पत्रे उडून गेल्याची माहिती समोर आली. रेमाल चक्रिवादळाचा परिणाम हा राज्यावर होताना दिसत आहे. यामुळे सध्या राज्यातील जळगाव, सोलापूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे.

यावत तालुक्यात पाच जणांचा मृत्यु

धाराशिव येथे वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाने मोठं नुकसान झालं आहे. धाराशिव येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यु झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे घरं पडली आहेत. यामध्ये चार जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावत तालुक्यात पाच जणांचा मृत्यु झाला आहे. (Unseasonal Rain)

सोलापूरच्या माढा जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. सोलापूरात वादळी वाऱ्यामुळे पेट्रोलपंपाचे छत उडून गेले आहेत.

मोहोळ तालुक्यात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. देवळी फाट्याजवळ पेट्रोल पंपाचे छत कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Unseasonal Rain)

मलकापूर येथील पोलीस स्टेशनचे पत्रे उडाले :

धाराशिव येथे एकाचा मृत्यु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घरावरील पत्रे उडून गेले. अशावेळी एकाच्या डोक्यात दगड पडल्याने मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील सांगवी या गावात घडली आहे. यावेळी घटनास्थळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसाने मलकापूर पोलीस स्टेशनला फटका बसला आहे. पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याचं समजतंय. तसेच अजूबाजूच्या परिसरातील झाडे पडली आहेत. पोलीस ठाण्यातील क्राईम रेकॉर्ड भिजले गेले आहेत.

 News Title – Unseasonal Rain News Update About Farmer lose

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी कारवाई, ससून रुग्णालयातील डॅाक्टरला अटक

हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?