INDvSA | दक्षिण आफ्रिका-भारत मालिकेपूर्वी मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर

नवी दिल्ली | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला उद्या 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाईल. मात्र ही मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

INDvSA | वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संघाबाहेर

डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे लुंगी एनगिडी टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी स्वत:ला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल.

INDvSA | दोन वर्षांनी हेंड्रिक्सला संधी मिळाली

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी एक निवेदन जारी करून सांगितलं की, एनगिडी अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जागी आता ब्युरोन हेंड्रिक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे एनगिडीला टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागल्याचे बोर्डाने म्हटलं आहे.

दुखापतग्रस्त एनगिडीच्या जागी संघात समाविष्ट झालेला हेंड्रिक्स दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने जुलै 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

हेंड्रिक्सने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी एक कसोटी, आठ एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सीएसएला आशा आहे की भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपर्यंत हा वेगवान गोलंदाज दुखापतीतून पूर्णपणे बरा होईल.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आपला सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कागिसो रबाडालाही विश्रांती दिली आहे. आता लुंगी एनगिडी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी तेवढी आक्रमक दिसणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Fennel Seeds | जेवणानंतर बडीशेफ खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात?, जाणून थक्क व्हाल

Sharad Pawar | मोठी बातमी! ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ

बेड(Bed)वर चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी, महिलांना अजिबात आवडत नाहीत!

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Entertainment | 26 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, कारण आहे फारच धक्कादायक!