Sharad Pawar | मोठी बातमी! ‘या’ नेत्याने सोडली शरद पवारांची साथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

सांगली | राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. सांगलीतील दोन बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते वैभव पाटील आणि माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Sharad Pawar यांना मोठा धक्का

आपण कायम आमदार जयंत पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचं सांगणारे माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये सहभागी होत असल्याचं वैभव पाटील यांनी जाहीर केलंय.

सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत शहर जिल्हा अध्यक्ष प्रा पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील बोलत होते.यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी उघडपणे अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

येत्या महिन्याभरात अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पक्षाची बांधणी सुरू असून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली.

वैभव पाटलांकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी

अजित पवार गटाकडून सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी विट्याचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांच्याकडे तर शहर जिल्हाध्यक्षपद प्रा. पद्याकर जगदाळे यांच्या हाती सोपवले. मिरजेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष केले आहे.

मुदत संपलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे 15 सदस्य होते, यापैकी दोन नगरसेवकांनी यापूर्वीच अजित पवार गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केलं आहे. उर्वरित सदस्यापैकी 10 जण आपल्या संपर्कात असल्याचा दावा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदाळे यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या- 

बेड(Bed)वर चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी, महिलांना अजिबात आवडत नाही अशा गोष्टी!

Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Entertainment | 26 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, कारण आहे फारच धक्कादायक!

सिद्धार्थ चांदेकरनंतर आता ‘या’ मराठी अभिनेत्रीनं लावलं आपल्या आईचं दुसरं लग्न! Amruta Phadke

Income Tax Raid | काँग्रेस खासदाराच्या घरी छापा, नोटा मोजणाऱ्यालाही फुटला घाम!