सिद्धार्थ चांदेकरनंतर आता ‘या’ मराठी अभिनेत्रीनं लावलं आपल्या आईचं दुसरं लग्न! Amruta Phadke

मुंबई | मराठातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता फडके (Amruta Phadke) हिने आपल्या आईचे दुसरे लग्न लावून दिले आहे. अमृताची आई स्मिता फडके या देखील फिल्म इंडस्ट्रीशी निगडित असून त्या एडिटिंग आणि कलरिस्ट म्हणून काम करतात. स्मिता या शिरीष केळकर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या आहेत. शिरीष केळकर हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे.

फेसबुकवर दिल्या शुभेच्छा-

अमृताने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपल्या आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच सर्वांपुढे आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. अमृताने (Amruta Phadke) आपली आई स्मिता फडके यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आई…., अभिनंदन ८.१२.२०२३ तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा… उत्तम लाईफ पार्टनर मिळावा, असावा, सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा असते. पण तस वाटणं, तसं मिळणं आणि घडणं हे प्रत्येकाच्या नशिबी असतच असं नाही. पण आई तुला ही संधी देवाच्या कृपेने पुन्हा मिळतीये. आणि तेही तुझ्या सेकंड इनिंगच्या टप्प्यावर!”

पुढे ती म्हणाली की, “खूप वर्षांपासून बाबा म्हणून हाक मारायला आणि ती जागा घ्यायला कोणीतरी असावं अशी मनापासूनची इच्छा होती. आणि माझ्या आयुष्यात हा शब्द आणि मनात ती जागा करणं सोप्प नव्हतं, पण बाबा तू खरंच ती जागा भरून काढू शकतोस ही भावनाही माझ्यासाठी खूप सुखावणारी आहे.”

Amruta Phadke: नव्या नात्यावरही व्यक्त झाली-

“तुझ्यामुळे मला प्रेम करायला अजून एक गोड भाऊ आणि एक सुंदर बहीण मिळालीये. मनानी खूप श्रीमंत असलेल्या खूप मोठया कुटुंबाचा मीही तुझ्यामुळे एक छोटासा भाग झालीये. खूप छान वाटतंय. मलाही खूप माणसांनी श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय. त्यासाठी खूप थँक यू, असं अमृताने (Amruta Phadke) आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे या वयात लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या आपल्या आईचंही तीनं कौतुक केलं आहे. “आई, हया वयात, आणि हया टप्प्यावर हा निर्णय घ्यायला खूप हिम्मत आणि खूप गट्स लागतात. त्यासाठी खरतर दोघांनाही हॅट्स ऑफ. तुमची एकमेकांबरोबरची साथ-सोबत, तुमचा प्रेमाचा धागा अजून अजून पक्का होऊन घट्ट विणला जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. खूप प्रेम”, असं तीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या पूर्वी सिद्धार्थ चांदेकरनंही आपल्या आईचं दुसरं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं होतं. आता अमृतानंही आपल्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. अमृताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही लाइक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृताचे मित्रपरिवार आणि चाहते तिचे कौतुक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ सुद्धा मुख्यंत्रिपदाच्या शर्यतीत!, इंदापुरातून मोठी अपडेट

Investment | कमी पगारातून ‘अशी’ करा बचत; सहज मिळतील 50 लाखांपेक्षा जास्त रिटर्न्स

Pune News | पुण्याचं टेन्शन वाढवणारी बातमी, दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई

AB de Villiers | एबी डिविलियर्सचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा

New Car | नवीन वर्षात कार घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!