Investment | कमी पगारातून ‘अशी’ करा बचत; सहज मिळतील 50 लाखांपेक्षा जास्त रिटर्न्स

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Investment | महागाई सध्या झपाट्याने वाढत जात आहे. यामुळे खर्चात देखील मोठी वाढ होते. मिळत असलेला पगार आपल्याला अपुरा पडतो. अनेकांना पैसे वाचवण्यासाठी धडपड करावी लागते. मात्र भविष्याचा विचार करून बचत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कधी कोणती अडचण येईल आपण सांगू शकत नाही. यावेळी आपण केलेली बचतच उपोयागाला येते. चांगल्या निजोयजनाने तुम्ही बचत करू शकता. यामुळे जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा तुम्हाला कोणाकडेही कर्ज मागण्याची गरज पडणार नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही कमी पगार असताना देखील मोठी बचत करू शकता.

Investment | इथे गुंतवा पैसे

तुमच्यामागे कितीही अडचणी असल्या तरी तुम्ही बचत केली पाहिजे. 20% नसेल शक्य तरी तुम्ही तुमच्या पगारातील 5 ते 10 टक्के बचत केली पाहिजे. हे पैसे तुम्ही हाय रिटर्न देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवा (Investment). असे गृहीत धारा की तुमचा पगार 30000 रुपये आहे.

Investment | 50 लाखांपेक्षा जास्त करू शकता बचत

याच तुलनेत दरमहा रु. 1500 वाचवले आणि 30 वर्षे गुंतवणूक (Investment )करत राहिल्यास आणि 12% रिटर्न मिळाल्यास तुमच्याकडे 50 लाखांपेक्षा जास्त रकमेची बचत होईल. म्हणजे ही छोटी गुंतवणूक तुमच्या भविष्यासाठी मोठा फंड निर्माण करेल.

अनावश्यक खर्च टाळा

दरम्यान, तुमच्या खात्यात महिन्याचा पगार जमा होण्यापूर्वीच तुमचं बजेट तयार करून घ्या ज्यात आवश्यक खर्चाला प्राधान्य द्या. त्यानंतर चित्रपट, शॉपिंग किंवा बाहेर खाणे यासारख्या तुमच्या छंदांसाठी बजेट तयार करा.

लोक महिन्याच्या शेवटी वाचवलेले पैसे बचतीमध्ये टाकतात, पण जोपर्यंत पैसे खात्यात राहतील तोपर्यंत खर्च होण्याची शक्यता असते, त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीत पैसे अगोदरच टाकावेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News | पुण्याचं टेन्शन वाढवणारी बातमी, दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई

AB de Villiers | एबी डिविलियर्सचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा

New Car | नवीन वर्षात कार घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Joe Solomon | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

TET Scam | तुकाराम सुपे पुन्हा अडचणीत, खळबळजनक माहिती समोर