Pune News | पुण्याचं टेन्शन वाढवणारी बातमी, दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली होती. दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. ही घटना उजेडात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी आपल्या तपासाची चक्रं वेगानं हलवली आणि आता या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

नेमका काय आहे हा प्रकार?

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून (ATS) राज्यभरात 44 ठिकाणी तर कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये 15 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे संशयित दहशतवादी अत्यंत खतरनाक असल्याची माहिती आहे.

NIA आणि ATS च्या पथकांकडून पुणे (Pune News) शहराबरोबर ठाण्याजवळील पडगासह राज्यातील अनेक भागांमध्ये छापेमारी सुरु आहे. पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती, त्यामुळे ही एक अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

दहशतवाद्यांकडून जप्त केलं धक्कादायक साहित्य-

NIA आणि ATSच्या पथकांनी दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. या दहशतवाद्यांकडे अनेक धक्कादायक साहित्य मिळालं आहे. यामध्ये बॉम्ब बनवण्याच्या साहित्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसरीकडे, घाटकोपर ट्रेन बाॅम्बस्फोट प्रकरणी साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामिन नाचन या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  तसेच अटकेतील इतर संशयितांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे देशाविरोधातील एक मोठा कट उधळल्याचं मानलं जात आहे.

यापूर्वीही पुण्यात कारवाई-

कोथरुड परिसरात वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती, त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. पोलिसांनी यानंतर पुण्यातील कोंढव्यासह काही भागांमध्ये छापेमारी केली होती, तसेच काही जणांना अटक देखील केली होती. पुण्यात ISISचं मॉडेल कार्यरत असल्याची माहिती यावेळी मिळाली होती. आताही पोलिसांनी याच प्रकरणात कारवाई केली असल्याची माहिती आहे.

News Title : pune news nia arrested 15 terrorists

थोडक्यात बातम्या-

Joe Solomon | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

TET Scam | तुकाराम सुपे पुन्हा अडचणीत, खळबळजनक माहिती समोर

रोहित आणि विराट T20 World Cup 2024 खेळणार नाही?, मोठं वक्तव्य आलं समोर

Pune News | पुण्यात धक्कादायक घटना, आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

Google Alert | गूगलने 17 Apps हटवले, तुमच्या फोनमध्ये असतील तर आत्ताच काढून टाका