TET Scam | तुकाराम सुपे पुन्हा अडचणीत, खळबळजनक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुणे सायबर पोलिसांनी टीईटी (TET Scam) म्हणजे शिक्षक पात्रता घोटाळा उघड आणला होता. त्यानंतर सुपे यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. टीईटी परीक्षेत पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर एसीबीकडून त्यांची चौकशी सुरु आहे.

TET Scam | तुकाराम सुपेंवर पुन्हा गुन्हा दाखल?

सुपे यांच्या घरी आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 3 कोटी 59 लाख रुपयांची अपसंपदा मिळाली. यानंतर एसीबीने त्यांच्यावर बेहिशेबी मलमत्तेप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सुपे यांच्या पिंपळे गुरव येथील घराची तपासणी केली. त्यात तीन कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता मिळाली. ही मालमत्ता पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावावर होती. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुपे यांच्याविरुद्ध एसीबीने सांगवी पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे तीन कोटी 59 लाख 99 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली होती. त्यात आणखी भर पडली आहे. आता पुन्हा तीन कोटी 95 लाख 35 हजार 795 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. एकूण मालमत्ता साडेसात कोटींपर्यंत गेली आहे. तसेच रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे मिळाली आहेत.

TET Scam | तुकाराम सुपे कोण?

तुकाराम सुपे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचा अध्यक्ष होता. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. सुपेवर युवाशाही आणि एमपीएससी समन्वय समिती आधीपासूनच नाराज होती. उत्तर सूची आणि प्रश्न सूचीत तफावत असल्याची तक्रार या दोन्ही संघटनेकडून करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी झाली नव्हती.

शिक्षण परिषदेने या तक्रारीवर आपले उत्तरही दिलं नव्हते. त्यामुळे या विद्यार्थी संघटनांचा संशय अधिकच बळावला होता. त्यानंतर हा घोटाळा (TET Scam) उघड झाल्याने सुपेचे काळे कारनामेही उघड झाले.

विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपेलाच अटक झाली. त्यामुळे टीईटी परीक्षेसंदर्भात कुंपणानेच शेत खाल्ले अशी चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहित आणि विराट T20 World Cup 2024 खेळणार नाही?, मोठं वक्तव्य आलं समोर 

Google Alert | गूगलने 17 Apps हटवले, तुमच्या फोनमध्ये असतील तर आत्ताच काढून टाका 

Hamza Saleem Dar | आरारारा खतरनाक!, 6 चेंडूत 6 षटकार आणि एका ओव्हरमध्ये 43 धावा

Jio | जिओच्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

Fighter Teaser | ऋतिक आणि दीपिकाचा हॉट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण