रोहित आणि विराट T20 World Cup 2024 खेळणार नाही?, मोठं वक्तव्य आलं समोर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पुढील वर्षी होणाऱ्या T20 World Cup 2024 विश्वचषकासाठी संघ निवडीबाबत जितकी चर्चा झाली आहे, तितकी चर्चा World Cup मध्ये झालेल्या टीम इंडियाच्या पराभवाबद्दल देखील झाली नाही. यामागे एक मोठं कारण आहे ते म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली.

“रोहित आणि विराट आगामी T20 मध्ये खेळावेत”

भारतीय चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की दोन सर्वात अनुभवी फलंदाज, रोहित शर्मा आणि विराट कोहली T20 World Cup 2024 चा भाग असतील की नाही, कारण हे दोघं गेल्या काही दिवसांपासून टी-20 क्रिकेटपासून लांब आहेत. आता यावर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने प्रतिक्रिया दिलीये. त्याने म्हटलं की रोहित आणि विराट आगामी T20 मध्ये खेळावेत, अशी त्याची इच्छा आहे.

मला त्यांना बघायला आवडेल. विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये आहे आणि खेळपट्ट्या बदलल्या आहेत. अर्थात ही आयसीसी स्पर्धा असल्याने खेळपट्ट्या अधिक चांगल्या असतील. तुम्ही सीपीएल तेथील स्थानिक क्रिकेट पाहिल्यास, फलंदाजांना खरोखर कठोर परिश्रम करावे लागतील. तिथेच अनुभव येतो, असं इरफाण म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आलेली की रोहित शर्मा कदाचित T20 क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही आणि त्याचं लक्ष फक्त कसोटी क्रिकेटवर ठेवेल. विराट कोहलीबद्दल असं बोललं जात आहे की त्याच्या जागी व्यवस्थापन आक्रमक फलंदाज म्हणून इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर आणेल.

टीम इंडियातील युवा फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. यामध्ये इशान किशन, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग इत्यादींचा समावेश आहे. यापैकी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये नंबर 3 वर विराटच्या (Virat Kohli) जागी इशान किशन मैदानावर उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा 2024 मध्ये विराटच्या (Virat Kohli) जागी नंबर 3 वर इशान किशन फलंदाजी करू शकतो, अशा चर्चा सुरू आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 2 फलंदाज आहेत. विराटच्या नावावर 4008 तर रोहितच्या नावावर 3853 धावा आहेत. आता या दोघांबाबत भारतीय निवड समिती काय भूमिका घेते हे पाहावं लागेल.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

Google Alert | गूगलने 17 Apps हटवले, तुमच्या फोनमध्ये असतील तर आत्ताच काढून टाका 

Hamza Saleem Dar | आरारारा खतरनाक!, 6 चेंडूत 6 षटकार आणि एका ओव्हरमध्ये 43 धावा

Jio | जिओच्या सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

Fighter Teaser | ऋतिक आणि दीपिकाचा हॉट अंदाज, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या Team India चं टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी!

Bollywood News | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास!