Chhagan Bhujbal | छगन भुजबळ सुद्धा मुख्यंत्रिपदाच्या शर्यतीत!, इंदापुरातून मोठी अपडेट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे (Chhagan Bhujbal) | देशाच्या राजकारणात सध्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चांगलंच चर्चेत आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ नेते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. अशामध्ये आता आणखी एक नवा चेहरा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आल्याचं पहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचंही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे.

छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील एक अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत राज्यात विविध मंत्रिपदांवर काम केले आहे. तसेच ते एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देखील राहिले आहेत. अशात त्यांच्या नावाची आता मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा सुरु झाली आहे.

नेमका काय आहे हा प्रकार?

मराठा आरक्षणाला ओबीसींमधून आरक्षण देण्याला छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) विरोध चालवला आहे. ते ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी सभा घेत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची आता सर्वत्र चर्चा आहे.

इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाहिला ओबीसी एल्गार मेळावा होत आहे. एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ थोड्याच वेळात संबोधित करणार आहेत, मात्र इंदापुरात सभास्थळी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात छगन भुजबळ यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

मेळाव्याची जय्यत तयारी-

इंदापुरातील मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त या मेळाव्याला गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, लक्ष्मण गायकवाड, टी. पी. मुंडे आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

मात्र सभास्थळी लागलेल्या बॅनर्सची राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे. ओबीसी मेळाव्यांच्या आडून छगन भुजबळ आपल्यासाठी मुख्यमंत्रिपदाची वाट चालू पाहात आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसी बांधवांचं प्रेम छगन भुजबळ यांना मिळालं तर ते नक्कीच मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार असतील अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

News Title: Chhagan Bhujbal in the Chief Ministerial race

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News | पुण्याचं टेन्शन वाढवणारी बातमी, दहशतवादाविरोधात सर्वात मोठी कारवाई

AB de Villiers | एबी डिविलियर्सचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा

New Car | नवीन वर्षात कार घेणार असाल तर ‘ही’ बातमी नक्की वाचा!

Joe Solomon | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

TET Scam | तुकाराम सुपे पुन्हा अडचणीत, खळबळजनक माहिती समोर