Gopichand Padalkar | गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | इंदापूर येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभा संपल्यानंतर अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar )यांच्या अंगावर चप्पल फेकली. मराठा आंदोलकांनी यावेळी गो बॅक अशा घोषणा देखील दिल्या.

गोपिचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली

ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे मराठा साखळी उपोषणाजवळ आले. त्यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. ज्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा होता त्या ठिकाणावर काही फुटावरती मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे. पडळकरांना पाहताच आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आपल्या भाषणात जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. यामुळे मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. गोपीचंद पडळकर आता तिथून निघून गेले आहेत.

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत असून ओबीसी समाजातील पोरांना दाखल्यासाठी ताटकळत राहावं लागत असल्याचा आरोप पडळकरांनी या सभेत बोलताना केला होता.

राजकारण, जात-पात-धर्म बाजूला ठेवा. सगळे ओबीसी नेते एक व्हा आणि भुजबळांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहा. एखादा नेता इकडे तिकडे गेला तर काही फरक नाही. मी हात जोडून विनंती करतो सर्वांनी ताकदीने उभे राहा, असं पडळकर म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

Entertainment | 26 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, कारण आहे फारच धक्कादायक!

सिद्धार्थ चांदेकरनंतर आता ‘या’ मराठी अभिनेत्रीनं लावलं आपल्या आईचं दुसरं लग्न! Amruta Phadke

Income Tax Raid | काँग्रेस खासदाराच्या घरी छापा, नोटा मोजणाऱ्यालाही फुटला घाम!

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ सुद्धा मुख्यंत्रिपदाच्या शर्यतीत!, इंदापुरातून मोठी अपडेट

Investment | कमी पगारातून ‘अशी’ करा बचत; सहज मिळतील 50 लाखांपेक्षा जास्त रिटर्न्स