“पुन्हा तुझं थोबाड दाखवू नकोस”, चेन्नईच्या गोलंदाजावर चाहते भडकले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 IPL 2024। आयपीएलचा 17 वा हंगाम सुरू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) अनेक ट्विस्ट घडताना दिसत आहेत. प्रत्येक संघामध्ये असा एकतरी खेळाडू असतो त्याच्या चुकीमुळे सामना गमवावा लागतो. चाहते त्याला ट्रोल करतात. असंच आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या खेळाडूसोबत झालंय. एका चाहत्याने त्याच्या कामगिरीवर संताप व्यक्त केलाय. (IPL 2024)

काल लखनऊ विरूद्ध सीएसके संघात सामना झाला. या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात संघ खेळत आहे. मात्र एमएस धोनीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने संघाची कामगिरी होती तशी कामगिरी सध्या पाहायला मिळत नाही. मात्र पराभवाला अनेक कारणं आहेत. मात्र सीएसकेचा गोलंदाज दीपक चाहरने केलेल्या काही चुकांमुळे त्याला सीएसकेच्या चाहत्यांनी डिवचलंय. (IPL 2024)

दीपक चाहरने पहिल्या पॉवरप्लेमध्ये दोन षटकं फेकली. त्यावेळी क्विंटन डिकॉकला एकही धाव काढून दिली नाही. त्याने त्या दोन षटकांमध्ये 11 धावा दिल्या. त्यानंतर त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. क्षेत्ररक्षण करत असताना त्याने तीन मोठ्या चुका केल्या. त्या तीन चुकांमुळे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

‘या’ तीन चुकांमुळे संघाचा पराभव झाला

16 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर चाहरने चेंडू रोखण्याची सोपी संधी सोडलीये. यामुळे चौकार गेला. 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चाहरने सर्वात मोठी चुक केली. मार्क स्टॉयनिसने मोठा फटका मारला परंतु क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेला खेळाडू झेल घेऊ शकला नाही. तिसऱ्यांदा चेंडू हाताला लागून गेला. अखेर मार्क स्टॉयनिसने लखनऊला विजय मिळवून दिला. (IPL 2024)

“तुझं थोबाड दाखवू नको”

दीपक चाहरच्या चुकांमुळे सीएसकेचे चाहते दीपक चाहरवर संतापले आहेत. त्यांनी दीपक चाहरला संघातून बाहेर काढण्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. तर एकाने तुझं थोबाड दाखवू नको अशी पोस्ट सोशल मीडियावर केली असून चाहरवर संताप व्यक्त केलाय.

IPL 2024 मध्ये सीएसकेचा 8 पैकी 4 सामन्यात पराभव झाला होता. पॉइंट्स टेबलमध्ये CSK पाचव्या स्थानावर असून प्लेऑफसाठी शर्यतीत आहे.

News Title – IPL 2024 Season In Csk Bowler Deepak Chahar Trolling

महत्त्वाच्या बातम्या

“एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला…”

ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी

‘मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करून गद्दारांचं नाव लिहीलं’

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्यानी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

विकी कौशलचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, ‘छावा’ चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे फोटो व्हायरल