सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

BJP Surat

BJP Surat | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. मात्र सूरत येथे असं काही घडलं आहे ते याआधी कधीच घडलेलं पाहायला मिळालं नाही. सूरत येथील एका मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने सूरत येथील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. आता सूरत येथे दलाल यांच्या विजयामागे आणखी काही लपलंय का? तसेच भाजपने हा विजय कसा मिळवला? असा सवाल केला जातोय.

मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय

भाजपचे सूरतचे (BJP Surat) उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. यावेळी परस्परविरोधी म्हणून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंबाणी होते. नीलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्याने मुकेश दलाल यांचा भाजपमध्ये (BJP Surat) निवडणुकीच्या निकालाआधीच विजय झाला. हा विजय झाला की विजय आखण्यात आला होता?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. मात्र आता या भाजपच्या पहिल्या विजयामागची गोष्ट वेगळी आहे का? या सर्व उमेदवारांचं आधी ठरलं होतं का? असे सवाल केले जात आहेत.

दलाल यांच्या विजयामागे भाजपची मोठी खेळी?

दरम्यान, सूरतमध्ये दलाल यांच्या विजयामागे मोठी भाजपची खेळी असल्याचं बोललं जातंय. ही स्क्रिप्ट आधीच लिहिली असल्याची चर्चा आहे. कुंभाणी यांच्या सहीवरून दलाल यांना बिनविरोध उमेदवारी देण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने कुंभाणी यांना 22 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलं होतं. 21 एप्रिलला कलेक्टर आणि निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. सही करणारे चारही साक्षीदार गायब झाले. 22 एप्रिलला मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर बीएसपी आणि अन्य छोट्या पक्षांचे आठ उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर सूरत येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर बीएसपीचे उमेदवार हे वडोदऱ्याला गेल्याची चर्चा आहे. त्यांना शोधण्यासाठी गुजरात क्राईम ब्रांच अॅक्टिव्ह मोडवर आहे.

फोन करून चारही उमेदवारांना हॉटेमध्ये बोलवलं. समोरासमोर बसवण्यात आलं. तेव्हा हे उमेदवार अर्ज मागे घ्यायला तयार झाले. यामुळे भाजपला बिनविरोध निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. 1984 पासून भाजप सूरत जागा जिंकत आला आहे.

News Title – BJP Surat Mukesh Dalal Win In Surat Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली

रणबीर कपूर सोबतच्या नात्याबाबत कतरिनाने केला खुलासा, म्हणाली…

“…तर मी राजकारणातून संन्यास घेईल”, महादेव जानकरांची मोठी घोषणा

‘…तर पुढे काही घडू शकतं’; पवारांसोबत जाण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .