‘बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून ..’; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mahesh Manjarekar | आताच्या काळात ट्रोलिंग करणं खूपच नॉर्मल झाल्यासारखं लोक समजतात. त्यात कलाकारांवर तर अत्यंत अश्लील भाषेत टीका केली जाते. सोशल मीडियावर याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. कोणत्याही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने काही फोटो टाकले, किंवा पोस्ट केली तर त्यावर नेटकरी ट्रोल करण्यास सुरुवात करतात.

या गोष्टींचा कलाकारांनाही मनस्ताप होतोच. मराठीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी असाच एक किस्सा संगितला. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ट्रॉलर्सना सज्जड दमच दिला. सध्या ते ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. याचनिमित्त त्यांनी एक मुलाखत दिली. या दरम्यान, महेश मांजरेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यातच त्यांनी ट्रोलिंग या मुद्द्यावरही भाष्य केलं.

नुकतंच सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. चिन्मय याच्या मुलाचं नाव जहांगीर असल्याच्या मुद्यावरुन चिन्मयला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. यामुळे चिन्मय आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला. इतकंच नाही तर, चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करणार नसल्याचंही स्पष्ट केलं.या प्रकरणाची एकच चर्चा असताना आता महेश मांजरेकर यांचं वक्तव्यं चर्चेत आलं आहे.

काय म्हणाले महेश मांजरेकर

‘मला या गोष्टीचा भयंकर राग येतो.लोकं म्हणतात दुर्लक्ष करा. का दुर्लक्ष करायचं? कोणी हक्क दिला तुम्हाला?,मी काही तुमच्याबद्दल वैयक्तिक बोललो आहे का? मी एक सिनेमा बनवतो. तो तुम्ही बघितला, तुम्ही पैसे टाकले त्याच्यासाठी. तुम्हाला हक्का आहे सांगायचा की मला सिनेमा नाही आवडला. माझे पैसे फुकट गेले किंवा मला आवडला माझे पैसे वसूल झाले. तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटीसाईज केलंत तर माझं काहीही म्हणणं नाही.’, असं महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) म्हणाले.

मुलगी, बायकोला बोलायचा हक्क तुम्हाला कुणी दिला?

पुढे त्यांनी सांगितलं की, मी प्रेक्षकांचा आदर करतो. मी तुमच्या आवडीचा आदर करतो. पण, मी एखादी पोस्ट केली की माझी आई, वडिल, माझी मुलगी, बायकोला बोलायचा हक्क तुम्हाला कुणी दिला?, त्यांच्याबद्दल बोललं तर मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन. असा सज्जड दमच महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी दिला.

याबाबत त्यांनी एक किस्साही सांगितला. एकदा तर माझ्या मुलीबद्दल सोशल मीडियावर इतकं भीषण काहीतरी लिहिलं होतं, मी त्या व्यक्तीला शोधलं आणि तक्रार केली. का माफ करावं अश्यांना? हे सगळं संपायला हवं. हे सगळं काही सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यासाठी एक कायदा तयार केला जाईल, तेव्हा संपेल. असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं.

News Title : Mahesh Manjarekar on Trollers

महत्त्वाच्या बातम्या-

सुरतमध्ये काँग्रेसमुळेच भाजपचा पहिला विजय?, सगळी स्क्रिप्ट आधीच ठरलेली?

…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

रील्स स्टार महिन्याला किती पैसे कमावतात? कमाई ऐकून व्हाल थक्क

“एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला…”

ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी