करीना कपूरचा नववर्षाचा संकल्प वाचून तुम्हीही विचारात पडाल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री करीना कपूर(Kareena Kapoor) नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळं तर कधी खासगी आयुष्यामुळं. करीना एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण तिचा स्वभावही एकदम बिनधास्त असल्याचे दिसून येते.

नुकत्याच एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करीना तिच्या कुटुंबाविषयी आणि करिअरविषयी बोलली आहे. करीना म्हणाली की, माझ्या कुटुंबातील प्रत्येकाचा बाॅलिवूडमधील प्रवास वेगवेगळा राहिला आहे. माझे वडिल, रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि काका ऋषी कपूर यांची बाॅलिवूडची जर्नी वेगळी होती. तसेच माझी बहिण करिश्मा(Karishma Kapoor) आणि माझा इंडस्ट्रीतील प्रवास वेगळा होता.

कुटुंबातील प्रत्येकानं वेगवेगळा मार्ग निवडला. या मार्गावर प्रत्येकानं यश मिळवूनही दाखवलं आहे. तसेच सर्वांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की, मी अशा कुटुंबाचा भाग आहे, असंही यावेळी करीना म्हणाली.

करीनानं मुलाखतीत तिचा नवीन वर्षाचा संकल्प काय आहे, हे देखील सांगतिलं आहे. ती म्हणाली की, या वर्षी मी स्वत:ला बॅलन्स ठेवायला शिकणार आहे. जेव्हा दोन मुलं असतात आणि त्यातून आपल्याला काम करायचं असतं तेव्हा आपली तारांबळ उडते.

जसं आपण एका पायावर उभं राहून आपलं शरीर बॅलन्स करण्यासाठी जी मेहनत करतो अगदी तशीच मेहनत मुलं सांभाळून काम करताना होते.

दरम्यान, करीना पती सैफ अली खानसोबत(Saif Ali Khan) आणि दोन मुलांसह नवीन वर्षाचं स्वागत करण्यास स्वित्झर्लंडला गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-