”देशाच्या इतिहासात मोदींचं नाव सुवर्णाक्षरात लिहलं जाईल”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी मोदींच्याहस्ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून दोन वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेला. यावेळी मोदींसह अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केल्याचं पहायला मिळालं.

देशाच्या इतिहासात मोदींचं नाव सुवर्णाक्षरात लिहलं जाईल असं वक्तव्य या सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी महाराष्ट्राला 13 हजार कोटी रुपये दिले गेले. यासगळ्याचा आम्ही कधी विचारदेखील केला नव्हता. भारतीय रेल्वेच्या आधुनिक इतिहासात एकच नाव लिहलं जाईल, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचं असेल,असंही ते म्हणाले.

वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) हा एक चमत्कार आहे. या रेल्वेची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. कल्पना न केलेली ही रेल्वे आता भारतातदेखील धावेल. पहिली रेल्वे मुंबई ते साईनगरी शिर्डीपर्यंत साईबाबांचा आशीर्वाद मिळावा,यासाठी धावेल. मुंबई ते सोलापूर अशी दुसरी रेल्वे सुरु करण्यात आली आहे,असं फडणवीसांनी सांगितलं

ही रेल्वे महाराष्ट्रातील भाविकांसाठी मैलाचा दगड ठरेल. या ट्रेनमुळं आई तुळजाभवानी, सिध्देश्र्वर महाराष्ट्राची देवता विठ्ठल यांचे आशिर्वाद घेता येतील, असंही ते पुढं म्हणाले. दरम्यान, मोदीचं या दौऱ्यासाठी स्वागत करत मुख्यमंत्री शिंदेनी (Chief Minister Shinde) मोदींना गणपतीची मुर्ती दिली.

महत्त्वाच्या बातम्या