भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी मोठा बदल, ‘या’ मॅचविनर खेळाडूची संघात एन्ट्री!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | भारताचा पुढचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी हा सामना खेळवला जाणार आहे, मात्र या सामन्यासाठी आता संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र खास या सामन्यासाठी आता एका मॅचविनर खेळाडूची संघात एंट्री झाली आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. ८ पैकी ८ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत १६ गुणांनिशी अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आपले सेमी फायनलमधील स्थान सुद्धा निश्चित केलं आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी नेदरलँडविरुद्धचा सामना हा एक चांगला सराव सामना असणार आहे.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघावर एक जबाबदारी सुद्धा असेल. वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहण्याचं दडपण भारतीय संघावर असणार आहे, कारण भारतीय संघाने आतापर्यंत एक सुद्धा सामना गमावलेला नाही. या सामन्यात जर भारताला पराभवाचा धक्का बसला, तर विजयाची साखळी तर तुटू शकतेच पण भारतीय संघासाठी ती एक लाजीरवाणी बाब सुद्धा असेल. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे.

दुसरीकडे नेदरलँड्सचा संघ ४ गुणांनिशी पॉइंट्स टेबलच्या अगदी तळाला आहे. असं असलं तरी त्यांना कमी लेखून चालणार नाही, जर त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांना दोन गुण मिळतील आणि त्यामुळे सहा गुण होऊन ते गुणतालिकेत थेट सातव्या क्रमांकावर पोहोचतील. त्यामुळे त्यांच्यासाठीही हा एक महत्त्वाचा सामना असणार आहे.

कोणत्या संघात काय बदल?

भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. गंभीर दुखापत झाल्यामुळे हा बदल करावा लागला आहे, त्यामुळे एका मॅचविनर खेळाडूची वर्ल्डकपमध्ये एंट्री झाली आहे. नेदरलँड्सच्या संघातील रायन क्लेन या खेळाडूला पाठीची दुखापत झाली आहे, त्यामुळे तो वर्ल्ड कपमधील उर्वरित सामने खेळता येण्याची शक्यता नाही. त्याच्या जागी२३ वर्षांच्या नोआ क्रोजला संधी देण्यात आली आहे. नोआ हा एक धडाकेबाज फलंदाज आहे आणि त्याला मॅचविनर म्हणून ओळखलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!