“यापुढे आम्ही शकीब अल हसनला दगड मारुन पळवून लावणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | वर्ल्डकपमधील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना चांगला चर्चेचा ठरला. याला कारण होतं बांगलादेशच्या शकीब अल् हसननं (Shakib al Hasan) श्रीलंकेच्या अँजेलो मँथ्यूजचा आऊट केलेला प्रकार… या प्रकाराची क्रिकेटच्या वर्तुळातच चर्चा झाली नाही तर दोन्ही देशांमध्येही आता या घटनेचे पडसाद उमटताना पहायला मिळत आहेत. अँजेलो मँथ्यूजच्या भावानं तर आता शकीबला थेट धमकीच दिली आहे.

वर्ल्डकपच्या महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला टाईमआउट केलं. मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशाप्रकारे टाइमआउट होणारा पहिला खेळाडू ठरला. या घटनेनंतर शाकिब अल हसन चांगलाच चर्चेत आला. काही क्रिकेट चाहते शाकिबचे समर्थन करत आहेत, तर काहींचे मत आहे की त्याने सर्व काही नियमानुसार केले तो अजिबात चुकीचा नाही. मात्र मँथ्यूजच्या भावाला या घटनेमुळे चांगलाच राग अनावर झाला आहे.

काय म्हणाला मँथ्यूजचा भाऊ?

“शाकिब अल हसनचे श्रीलंकेत आता कोणीही स्वागत करणार नाही. तो श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना किंवा लंका प्रीमियर लीग खेळण्यासाठी आला तर त्याच्यावर दगडफेक केली जाईल, असं मँथ्यूजच्या भावाने म्हटलं आहे.

मँथ्यूजच्या भावाच्या या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे की श्रीलंकेचे क्रिकेट चाहते शकीब अल हसनवर चांगलेच संतापलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, समरविक्रमा बाद झाल्यानंतर मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात आला होता. तेव्हा तो खेळपट्टीवर पोहोचला पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटल्याचे त्याच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन मॅथ्यूजने दुसरं हेल्मेट मागवलं, मात्र यावेळी शाकिब अल हसनने टाइम आउटचे अपील केले. नियम लक्षात घेता अंपायरने सुद्धा मँथ्यूजला आऊट दिलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हा’ माजी मंत्री अडचणीत; राजकारणात खळबळ

येत्या 24 तासांत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस 

पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!