पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

अहमदनगर | तुम्ही गुंड लोकं जेलचे गज कापून पसार झाल्याचे अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. मात्र प्रत्यक्षात असं घडलयं. कैदेत असलेले आरोपी गज कापून पसार झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चार आरोपी कैदेत होते. ते चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले आहेत. जेलचे गज कापून त्यांनी जेलमधूल धुम ठोकली. बुधवारी पहाटे साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे त्यावेळी चार पोलिस कर्मचारी ड्युटीवर असताना ही लाजीरवानी घटना घडली. राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल आणि अनिल काळे असे पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पसार झालेल्या आरोपींवर विविध गुन्ह्यात खटले चालू आहेत. त्यांच्यावर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून आरोपी पसार होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आगोदरही अशी घटना घडली होती. वर्षभरापुर्वी दोन आरोपी जेलमधून पसार झाले होते. या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती झाली. त्यामुळे पोलिसांच्या कृतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

जेलमधून पसार झालेल्या आरोपींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार पळून गेले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

महत्त्वच्या बातम्या – 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!