मुंबई | बीड येथे झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारला इशारा दिला होता. त्यांच्या याच इशाऱ्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भुजबळ यांना घेरलं.
छगन भुजबळ यांच्याविरोधात सर्व सरकारचे नेते अशी परिस्थिती उद्भवली. मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका योग्य नाही. यामुळे सरकार पडेल अशी भीती मंत्री शंभूराजे देसाई यांनी या बैठकीत व्यक्त केली.
आरक्षणाच्या मुद्यावरुन शंभूराजे देसाई यांच्यासह जवळपास 8 मंत्र्यांनी भुजबळांविरोधात तक्रार केली. छगन भुजबळ यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. टोकाची भूमिका घेऊन भावना भडकवण्याचा काम करू नये, असं ते म्हणालेत.
ही बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला अशी माहिती आहे. सरकार धोक्यात येईल अशी कुठलीही विधान यापुढे नेत्यांनी करता कामा, असं शिंदे म्हणालेत.
दरम्यान,मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याविरोधात आवाज उठवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!
धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!