पाडव्याला गोविंद बागेत जाणार?; अजित पवारांनी स्वत:च सांगितलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | आजपासून दिवाळीचा (Dipawali) सण सुरु होत आहे. राज्यात दिवाळीची उत्साहत तयारी सुरु आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे कुटुंब काटेवाडीतील निवासस्थानी एकत्र येत दिवाळीचा सण साजरा करत असतात. तसेच सर्वांना प्रत्यक्षात भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. मात्र अजित पवार यंदाच्या दिवाळीच्या सणात सहभागी होणर नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) दरवर्षी दिवाळाच्या निमित्ताने सर्वांना भेटून शुभेच्छा देत असतात. मात्र यंदाच्या दिवाळीला ते कोणालाच भेटू शकणार नाहीत. त्यांनी ट्वीट करत स्वतः या बद्दल माहिती दिली आहे.

अजित पवार यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी, प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे.

दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आजारी आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार चालू आहेत. त्यांना डेंगूची लागण झाली आहे. आजारपणामुळे त्यांना सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहता येत नाहीत. त्यामुळे त्यांना दिवाळीच्या सणात सहभागी होता येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोलीस दलात खळबळ!, फिल्मी स्टाईल घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”