शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ उपस्थित होतं. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय घेण्यात आला?

पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी राज्याच्या काही भागात पाऊस हवा तसा पडला नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

तरीही शेतकऱ्यांनी पिकं उभी केली आहेत. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणं आता जास्त आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलंय.

सरकारने घेतलेल्या निर्णयात या योजनेसाठी तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बैठकीत बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या धोरणांचा त्यांना मोठा फायदा होणार आहे.

या धोरणासाठी 4250 कोटींच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय म्हणजे विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं देखील मु्ख्यमंत्र्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल