17 वर्षांची मुलगी चालवायची सेक्स रॅकेट! पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक गोष्टी

मुंबई | मुंबईतून तुमच्या भुवया उंचवणारी माहिती समोर आली आहे. चक्क 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवत असल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वाशी परिसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत होता. त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर त्या हॉटेलमध्ये चालत असलेल्या सेक्स रॅकेटची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी त्या हॉटेलमधून काही जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता हे सेक्स रॅकेट 17 वर्षीय मुलगी चालवत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांना समजली.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वाशी परीसरातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला त्या हॉटेलमध्ये पाठवलं. त्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये छापा टाकला.

छाप्यानंतर चार मुलींची सुटका करण्यात आली. त्या 20 वर्षीय मुली होत्या. यातील दोन मुली बिहार तर, एक मुलगी नेपाळची होती. त्या मुलींना पुनर्वसन केंद्रात पाठवले असुन, त्यांचे समपुदेशन केलं जाणार आहे.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्यांना घटनास्थळावरुन काही रक्कम आणि महागडे घड्याळ मिळाले. याशिवाय पोलिसांना दिड लाख रुपायांच्या बनावट नोटाही मिळाल्या. या प्रकरणी पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 17  वर्षांय अल्पवयीन मुलीवर मानवी तस्करीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सेक्स रॅकेट चालवणारी मुलगी मलाडमधील राहणारी आहे. वेशा व्यवसायातून ती मुलगी मोठा पैसा कमवत होती. त्या पिडीत मुलींना जबरदस्तीने हा व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं. या बदल्यात त्या मुलींना फारच कमी रक्कम देण्यात येत होती, अशी माहिती पोलिसांंनी दिली. या प्रकरणी पोलिस आधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य