लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मोठा प्लॅन!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपुर | लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सगळ्याच पक्षांकडून मोर्चेबांधणी चालू आहे. विविध पक्षांचे नेते मतदारसंघात दौरे करत आहेत. मनसेनं (MNS) देखील लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मनसेने तयारी केल्याचं कळतंय. वसंत मोरेंनी पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आता मनेसेनं विदर्भात देखील कंबर कसली आहे. मनसे विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढवणार आहे.

मनसेनं विदर्भातील (Vidarbha) चार लोकसभेच्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी चालू केली आहे. यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) हे विदर्भात सभा घेणार आहेत. याबाबत मनसे नेते राजू उंबरकर यांनी माहिती दिली आहे.

विदर्भातील अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर-वणी आणि वाशिम या चार लोकसभा मतदारसंघात मनसे निवडणूक लढवणार आहे. राज ठाकरे यांच्या या मतदारसंघात सभा होणार आहेत. त्यांच्या सभांमुळे या चारही मतदारसंघात मनसेचा खासदार जिंकेल, असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष नवणीत राणा, वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे विद्यामान खासदार आहेत.

चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते बाळा धानोरकर हे खासदार होते. अशातच मनसेनं या मतदारसंघात लक्ष दिलं आहे. त्यामुळे विद्यामान खासदारांना येणारी लोकसभा निवडणुक अवघड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्तवाच्या बातम्या – 

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा!