“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. कोरोना काळात कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज पेडणेकरांना चौकशीला हजर राहण्याचं समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. दरम्यान पेडणेकरांवर शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी त्यांना डिवचलं आहे. शितल म्हात्रे यांच्या अधिकृत X अकाऊंटवरुन त्यांनी पेडणेकरांनवर टीका केली.

काय म्हणाल्या शितल म्हात्रे?

“कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं… दिवा पण फडफडून विझणार वाटतं…”, असं शितल म्हात्रे यांनी ट्विट केलं होतं.  म्हात्रे यांनी केलेल्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.

किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन ट्विट करत म्हणाल्या की, “शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे. मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय????”

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेत विविध घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले होते. त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार केली होती.

थोडक्यात बातम्या- 

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा! 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश!