मुंबई | क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं, असं का म्हटलं जातं, ते कालच्या सामन्यावरुन स्पष्ट झालं. मॅक्सवेलची इनिंग ही खूप काही शिकवून जाणारी आहे. ग्लेन मॅक्सवेल (Glain Maxwell) याने ऑस्ट्रेलियाला गमावलेला सामना एकहाती जिंकून दिला. यानंतर ग्लेन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला.
ऑस्ट्रेलिया हरणार, ऑस्ट्रेलियाने मॅच गमावली, असं बहुतेक लोकांनी गृहित धरलं होतं. कारण 18.3 ओव्हर्समध्ये 91 रन्सवर 7 विकेट तिथून विजयासाठी आणखी 200 धावा करायच्या होत्या. ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर ज्या पद्धतीने ढेपाळली, ते पाहता विजय अशक्य वाटत होता. पण मॅक्सवेलने अशक्य वाटणारा विजय खेचून आणलाय.
एक धावही काढण शक्य नव्हतं, त्या परिस्थितीतही तो मैदानावर उभा राहिला. 128 चेंडूत नाबाद 201 धावा त्याने द्विशतक झळकावलं. 21 फोर, 10 सिक्स ही त्याची इनिंगच सर्वकाही सांगून जाते. मॅक्सवेलच्या या विजयाची सध्या राजकारणात देखील जोरदार चर्चा सुरू आहे. कारण त्याच्या या विजयाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेशी लावण्यात आला आहे.
रोहित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेचा फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे की, परिस्थिती कितीही विरोधात असली आणि मैदानात योद्धा जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं. नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो, असं ट्विट रोहित पवारांनी केलाय.
अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते… मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”
Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल
‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य
मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा!