सुषमा अंधारेंच्या आरोपाने राजकारणात खळबळ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मराठा आरक्षणासाठी (Maratha Resrvation) मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, यासाठी त्यांनी आंदोलन केलं. परंतू या मागणीच्या विरोधात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (SushmaAndhare) राज्य  सरकारवर आरोप केले आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या,” मराठा समाजााला आरक्षण मिळालंच पाहिजे. छगन भुजबळ यांनी काय बोलावं त्यांचा आधिकार आहे. हिंदू-मुस्लिम भांडण लावण्याचा डाव फसला. दुष्काळासारख्या इतर प्रश्नवरुन लक्ष हटवण्यासाठी, जाती- जातीमध्ये वाद लावले जात आहेत ”

खासदार हेमंत पाटलांनी स्टंटबाजी करत राजीनामा दिला. परंतू लोकं सुजाण आहेत. ‘ये पब्लिक हे ये सब जाणती हे’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच  जरांगे पाटलांच्या भेटीला न्यायाधीश पाठवण्याचा निर्णय फडणवीसांचा होता. भुजबळ वेगळच म्हणतात. त्यांच्या या टॉम अँड जेरीच्या खेळात मला जास्त रमायचे नाही असं म्हणत त्यांनी जास्त बोलण्याचे टाळलं.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला विरोध केला आहे. त्यांच्या निवासस्थानी काल राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या सरंक्षणासाठी लढण्याचा निर्धार केला आहे. छगन भुजबळांनी एकप्रकारे सरकारच्या विरोधातच दंड थोपटले आहेत.

ओबीसी आरक्षणासाच्या (OBC Reservation) सरंक्षणासाठी  दिवाळीच्या नंतर जालन्यातील आंबडमध्ये ओबीसी समाजाचा पहिला मेळावा पार पडणार आहे. 17 नोव्हेंबरला हा मेळावा असणार आहे. त्यानंतर संपुर्ण राज्यात मेळावे होणार आहे. त्यासोबतच राज्यभर आंदोलन उभारलं जाणार आहे. ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी याबाबत माहिती दिली.

 

 

महत्त्वाच्या बातम्या –

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा! 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश! 

Naukari 2023 | मुंबई महापालिकेत मेगा भरती, 96 हजारापर्यंत पगार