मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

मुंबई | सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. दिवाळीचा (Dipawali) सण दोन दिवसांवर आला आहे. दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु आहे. बाजारपेठा गजबजल्या आहेत. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज देखील सोन्याच्या (Gold) भावात घसरण झाली आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने चांदी खरेदी केली जाते. परंतू त्या आधिच सोन्याच्या भावात घसरण होताना दिसत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. आज सोन्याच्या दरात  160 रुपयांनी घसरण झाली आहे.

गेल्या दहा दिवसात सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत 1400 रुपयांपर्यंत सोन्याच्या भावात घसरण झाली. गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, आज 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्यासाठी  61,200  रुपये दर आहे.

चांदीचा (Silver) दर स्थिर होता. परंतू आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. काल एक किलो चांदीचा दर 74,500 रुपये इतका होता. आजच्या चांदीच्या दरात 1000 रुपायांनी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दर 73,500 रुपये आहे.

कोणत्या शहरामध्ये किती सोन्याचा दर ?

नागपुरः 61200 रुपये

नशिकः 61230 रुपये

पुणेः   61200 रुपये

कोल्हापुरः  61360 रुपये

महत्त्वाच्या बातम्या – 

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा!