राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जरांगेंची मोठी मागणी!

मुंबई | मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना त्यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे.

काल सरकार कडून फोन आला होता. टाईम बाँड देण्यासाठी आजचा दिवस वाढवून द्या असं सरकारतर्फे सांगितलं आहे. यामुळे उद्या शंभर टक्के घेऊन येतील. अन् जर उद्या नाही आले तर मग सांगतो त्यांना. फडणवीस यांनी भेटायला कुणाला यायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही आरक्षणासाठी लढतो आहे. माझी ताब्यात ठीक आहे. दोन तीन दिवसात काम सुरू करेल, असं ते म्हणालेत.

माझा दौरा दिवाळी नंतर सुरू होणार. आरक्षण मिळेपर्यंत फटाके वाजवणे नाही. माझ्या भावाच्या घरात अंधार झाला. यामुळे दिवाळी साजरी करणार नाही. माझ्या भावांनी बलिदान दिलं. मी कशी दिवाळी साजरी करू?, असा सवाल त्यांनी सरकारला केलाय.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्यावा, आत्महत्या केलेल्याना निधी व नोकरी द्यावी, त्यानं आधार नाही. त्यांना आधार द्यावा ही विनंती, त्यांच्या लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवण्यासाठी बैठकीत निर्णय घ्यावा, अशीही मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा नेत्यांनी इतरांना आरक्षण दिलं मात्र समाजाला दिलं नाही. 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर कोणी आरक्षण दिलं नाही ते नाव जाहीर करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणालेत.

ओबीसी नेत्यांची आमच्या तालुक्यात सभा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र एखाद्याच्या जमिनीचे पुरावे त्याच्याकडे असतील तर जमीनवर त्यांचा हक्क आहे, ती जमीन त्यांना मिळावी तसेच कुणबी पुराव्याचं आहे. ओबीसी नेते कुणबी पुरावे असताना आरक्षण देऊ नका म्हणत असाल तर तुम्ही मराठ्यांच्या गरिब मुलांवर का कोपला आहात असंच म्हणावं लागेल, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .