टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतीय क्रिकेट संघांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा युवा आणि डॅशिंग फलंदाज शुबमन गिल याने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 स्थान पटकावलं आहे.

शुबमन गिल नंबर 1 

आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. शुबमन गिल याने 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध 23 आणि 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंका विरुद्ध 92 धावांची खेळी केली होती.

शुबमन या खेळीच्या जोरावर बाबर आझम याला मागे टाकण्यात यशस्वी ठरला. गिलने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध तडाखेदार फलंदाज करुन 2 पॉइंट्स भरुन आणि बाबर आझमला मागे टाकण्यात यश मिळवलं.

शुबमन गिल आणि बाबर आझम या दोघांमध्ये आता 6 पॉइंट्सचा फरक आहे. शुबमनच्या नावावर आता 830 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर बाबरच्या खात्यात 824 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

टीम इंडियाने या 13 वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वा धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया आता या स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला अखेरचा सामना हा रविवारी 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्स विरुद्ध खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी जरांगेंची मोठी मागणी!

मोठी गुड न्यूज; सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल