पैसे झाले डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई

नवी दिल्ली | शेअरमार्केट (Share market) मध्ये रिस्क फार असते कधी लाॅस होईल सांगता येत नाही. यामध्ये चढाउतार नेहमीच ठरलेले असतात. इतकं सगळ असून देखील अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण असे काही शेअर असतात जे अचानक तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतात.

ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअरनी गुंतवणूकदारांना भरपूर फायदा मिळवून दिला आहे. या शेअरनं अवघ्या पाच वर्षांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं रूपांतर 10 लाख रुपयांमध्ये केलं आहे. या कालावधीत, स्टॉकनं मल्टीबॅगर रिटर्न देऊन आपल्या गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केला आहे.

हा शेअर 299 रुपयांहून 3,209 रुपयांवर पोहचला आहे. 5 वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचा एक शेअर 299 रुपयांवर होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिलेच नाही.

या शेअरने या कालावधीत 970 टक्क्यांहून अधिकचा मल्टिबॅगर रिटर्न दिला. मंगळवारी हा स्टॉक 2.16 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता सकाळच्या सत्रात 10:33 वाजता 3,241 रुपयांवर ट्रेड करत होता.

आता या रिटर्नच्या आधारे गुंतवणूकदारांच्या पैशात झालेली वाढ पाहिली, तर एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी जर Tube Investments of India Ltd च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि ते आतापर्यंत ठेवले असतील, तर ही गुंतवणूक आता तब्बल 10 लाखांपर्यंत वाढली असती.

जर आपण गेल्या सहा वर्षांचा विचार केला तर या स्टॉकमधून मिळणारा परतावा 1100 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच, 6 वर्षांत 1 लाख रुपये 11 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता! 

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य 

मुंबई हायकोर्टात मोठी मागणी, हा आरक्षण देणारा अध्यादेश रद्द करा! 

मराठा आरक्षणासाठी कंबर कसली… शिक्षकांना दिला मोठा आदेश!