…म्हणून मॅक्सवेलला रनर घेता आला नाही!, समोर आली सर्वात मोठी माहिती

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | तो आला… तो लढला… आणि तो जिंकला… मंगळवारी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर सर्वांची जवळपास हीच प्रतिक्रिया होती. दुबळ्या म्हणवल्या गेलेल्या अफगाणिस्ताननं बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियापुढं 292 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाची 96 धावांवर 7 खेळाडू बाद अशी केविलवाणी अवस्था झाली होती, अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं जी खेळी केली तीचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील.

मॅक्सवेलच्या खेळीचं जगभरातून कौतुक केलं जातंय, त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जातायेत, मात्र हा सामना पाहिलेल्या सर्वांना राहून राहून एकच प्रश्न सतावतोय. तो म्हणजे अफगाणिस्तानविरुद्ध एकहाती सामना फिरवताना ग्लेन मॅक्सवेलच्या पायांमध्ये बळ राहिलं नव्हतं. अशा परिस्थितीतही त्यानं रनर का घेतला नाही. सामना सुरु असतानाच अनेकांना हा प्रश्न पडला असेल, अनेकांना त्याचं उत्तर मिळालं नव्हतं, मात्र आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

ग्लेन मॅक्सवेलला रनर का घेता आला नाही?

अफगाणिस्तानच्या विरोधात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची 7 बाद 96 अशी अवस्था झाली होती, अशा परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेल खेळत होता. तो फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाला जवळपास अडीचशे धावांची गरज होती, अशा परिस्थितीत मॅक्सवेल एकहाती लढला. त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं खंबीर साथ दिली.

अफगाणिस्तान विरुद्ध खेळताना एक वेळ तर अशी आली होती की मॅक्सवेलला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्यासाठी एक रन काढताना सुद्धा मॅक्सवेलला फार कष्ट पडत होते, या अवस्थेत त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फसला. एकदा तर तो धाव काढल्यानंतर थेट मैदानावरच कोसळला, पायात जोरदार क्रॅम्प आल्यानं हे घडलं. एवढं सगळं घडूनही मॅक्सवेलला रनर मिळाला नाही, याचं कारण ICCच्या एका निर्णयात आहे.

ICCचा तो निर्णय काय आहे आणि कधी झाला?

ICC कार्यकारी समितीने 2011 साली रनर संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यानूसार एकदिवसीय सामन्यांमध्ये जखमी फलंदाजांसाठी रनर न देण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळामध्ये खूप व्यत्यय येतो आणि यामुळे फार वेळ वाया जातो, असा दाखला देण्यात आला होता. तेव्हापासून रनर देणं बंद करण्यात आलं. याच नियमामुळे जायबंदी होऊनही मॅक्सवेलला रनर देण्यात आला नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे हा नियम फक्त आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीच लागू आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी रनरचा नियम तसाच ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ICCच्या या निर्णयाला त्यावेळी विरोधही झाला होता. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर!

धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!