महाराष्ट्रातील जनतेसाठी धोक्याची घंटा, पुन्हा मास्क सक्ती होणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नागपूर | राज्यातील काही भागात दिवसेंदिवस प्रदुषण वाढत चाललं आहे. मुंबईसह आता पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या सारखे अनेक शहर प्रदुषणाच्या विळख्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात प्रदुषणात प्रमाणाच्या बाहेर वाढ झालेली दिसत आहे. वाढत्या प्रदूषण आणि संसर्गजन्य रोगामुळे राज्याची वाटचाल मास्कसक्तीकडे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्यात वाहनांचा वाढती संख्या, त्याचबरोबर वाहनांनमधील निघत असलेला धूर यामुळे देखील प्रदुषणात वाढ होत आहे.

यासोबतच धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन ,बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन, इतर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे अनेक जिल्ह्यात प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. प्रदुषणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या मुंबई, पुणे, संभाजी नगर, नागपूरचे प्रदूषण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.

वाढत्या प्रदुषणामुळे काही नागरीकांना त्रास होतो. हिवाळा आणि त्यामध्ये प्रदुषणाची धुळीमुळे अनेकांच्या घरातील व्यक्ती आजारी पडू लागतात. अनेक जण सर्दी, खोकला तापाने त्रस्त आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण जबाबदार आहे.

थोडक्यात बातम्या- 

बच्चू कडूंची ‘ती’ ऑडिओ क्लीप व्हायरल!

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल